-
कपूर आणि बच्चन कुटुंबांप्रमाणेच खान कुटुंबही बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सलीम खान यांची चार मुले आणि दोन्ही जावई चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत.
-
सलीम खान हे स्वतः बॉलिवूडचे सुपरस्टार लेखक राहिले आहेत. सलीमची दुसरी पत्नी हेलन ही त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. चला जाणून घेऊया खान कुटुंबातील सदस्य किती शिक्षित आहेत
-
सोहेल खानने इंटरमीडिएट शिक्षण घेतले आहे. मुंबईतील सेंट स्टॅनिस्लॉस शाळेत त्यांचे शिक्षण झाले.
-
त्याला पायलट व्हायचे होते. त्याने पायलट ट्रेनिंग कोर्ससाठी अर्ज केला पण डोळ्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर तो फिल्म लाइनमध्ये आला.
-
अरबाज खानला सुरुवातीपासूनच चित्रपटात काम करायचे होते. ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
-
शोले आणि आनंद यांसारख्या कल्ट चित्रपटांची कथा लिहिणारे प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी इंदूरच्या सेंट राफेल स्कूलमधून इंटरमीडिएट शिक्षण घेतले आणि त्यानंतर होळकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सलीम खान यांनी इंदूरच्या होळकर कॉलेजमधून बीए आणि एमए केले.
-
सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. जवळपास ३० वर्षांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय असलेल्या सलमानने ग्वाल्हेरमधील प्रसिद्ध ‘द सिंधिया स्कूल’मध्ये काही वर्षे शिक्षण घेतले.
-
त्यानंतर त्याने मुंबईतील सेंट स्टॅनिस्लॉस येथे शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर सलमानने ग्रॅज्युएशनसाठी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
-
मात्र त्याने ग्रॅज्युएशन मधेच सोडले आणि चित्रपटात काम सुरु केले.
-
१९८८ मध्ये त्याने ‘फलक’ चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
सलमान खानची बहीण अलविरा खान हिचे लग्न अतुल अग्निहोत्रीशी झाले आहे. अलविराने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतली आहे.
-
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिताने लंडनमधून शिक्षण घेतले आहे. अर्पिताने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. (Photos : Instagram)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल