-
मागच्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाबद्दलच्या चर्चा सुरू होत्या.
-
हंसिका तिचा बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर सोहेल खातुरियाबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.
-
अगदी चित्रपटातल्या सीनप्रमाणे सोहलने रोमँटिक अंदाजात गुडघ्यावर बसून आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं होतं.
-
आता रविवारी ४ डिसेंबरला या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत.
-
अलीकडेच हंसिकाच्या कुटुंबीयांनी मुंबईत ‘माता की चौकी’चे आयोजन केले हिते. आता अभिनेत्रीच्या लग्नाचे विधीही सुरू झाले आहेत.
-
नुकतंच हंसिकाचा मेहंदी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
-
यावेळी हंसिकाने केशरी आणि पिवळ्या रंगाचा टाय-डाय शरारा सूट घातला आहे. यासोबत तिने ऑक्सिडाइज्ड कानातले घातले आहेत.
-
हलका मेकअप आणि मेसी हेअर लूकमध्ये हंसिका अतिशय खुश दिसत होती.
-
जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये या जोडप्याचे लग्न मोठ्या थाटात पार पडणार आहे.
-
सध्या हंसिकाच्या लग्नसोहळ्यातील आणखी काही झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम/hansika.officiaal

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”