-
सध्या बॉलिवूडमध्ये घरोघरी सनई चौघडे ऐकू येत आहेत किंवा नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. नुकतंच ‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने एक गोड बातमी देत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.
-
येत्या २५ डिसेंबरला गौहर आणि झैद यांनी त्यांच्या लग्नाचा दूसरा वाढदिवस साजरा करतील. त्याआधीच खुद्द गौहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. अतिशय वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.
-
एक कार्टूनचा व्हिडिओ शेअर करत ‘गौहर झैद आणि +१’ असं सांगत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. याबरोबरच “या सुखद प्रवासात तुमच्या आशीर्वादाची गरज आहे” असं लिहीत गौहरने चाहत्यांना सरप्राइज दिलं.
-
आता या गोड बातमीमुळे गौहरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता गौहरच्या बेबी बंपचे आणि छोट्या बाळाचे फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
-
२५ डिसेंबर २०२० मध्ये गौहर खान आणि झैद दरबार विवाहबंधनात अडकले. यानंतर या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या बऱ्याच आठवणी शेअर केल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
-
गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘१४ फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. आता गौहरच्या बेबी बंपचे आणि छोट्या बाळाचे फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
-
सध्या गौहर तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. झैद दरबारशी तिच्या लग्नाला दोन वर्षं झाली असली तरीही त्यांचं नातं अजूनही नवंच वाटतं. गौहरने दिलेल्या या गोड बातमीच्या पार्श्वभूमीवर आज आपण गौहर खान आणि झैद दरबार यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.
-
झैद संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत देणारे इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद हा डान्सर आहे.
-
सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. येत्या २५ डिसेंबरला गौहर आणि झैद यांच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण होतील.
-
या हॅप्पी कपलची लव्हस्टोरीही तितकीच खास आहे. झैदने गौहरला एक ग्रोसरी शॉपमध्ये पाहिलं होतं. यानंतर त्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
-
या दोघांचे नाते मैत्रीपासून सुरू झाले आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. कालांतराने दोघांनीही आपल्या कुटुंबियांच्या परवानगीने लग्न केले. (सर्व फोटो: Instagram)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा