-
२०२२मध्ये अनेक सेलिब्रिटी लग्नाबंधनात अडकले. रणबीर कपूर-आलिया भट्टपासून ते नयनतारा-विघ्नेश शिवन आणि जेनिफर लोपेझ-बेन ऍफ्लेकपर्यंत अनेक कलाकारांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. पाहुयात वर्षभरातील सेलिब्रिटी विवाहांची यादी…
-
-
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूरने १४ फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशमधील शाहतलाईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी पारंपारिक पद्धतीने लग्न केलं.
-
फरहान अख्तर व शिबानी दांडेकरने १९ फेब्रुवारी रोजी लग्न केलं. दोघेही एकमेकांना तीन वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी फरहानच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं.
-
सना कपूर आणि मयंक पाहवा यांनी २ मार्चला लग्न केलं.
-
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतली जोडी आलिया भट्ट व रणबीर कपूरने १४ एप्रिलला लग्नगाठ बांधली.
-
रिचा चड्ढा- अली फजलने ४ ऑक्टोबरला लग्नगाठ बांधली.
-
-
टीव्ही अभिनेता मोहित रैनाने अदितीशी १ जानेवारीला लग्न केलं होतं.
-
स्टँड अप कॉमेडियन केनेथ सेबॅस्टियन आणि ट्रेसी अॅलिसन यांनी १६ जानेवारीला गोव्यात लग्न केलं होतं.
-
मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी २७ जानेवारीला लग्न केलं. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी गोव्यात लग्नगाठ बांधली.
-
करिश्मा तन्ना हिने तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेराशी ५ फेब्रुवारीला लग्न केलं होतं.
-
पायल रोहतगी व संग्राम सिंग यांनी ९ जुलै रोजी आग्र्यात लग्न केलं. ot married in Agra this year.
-
-
नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी ९ जुन रोजी चेन्नईमध्ये लग्नगाठ बांधली होती.
-
हंसिका मोटवानी आणि सोहेल खातुरियाने ४ डिसेंबरला लग्न केलं. त्यांनी जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.
-
-
बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ यांनी १६ जुलै रोजी लग्न केलं होतं.
-
ब्रिटनी स्पीयर्स आणि सॅम असघारी यांनी ९ जून
रोजी लग्न केलं होतं. -
कोर्टनी कार्दशियन आणि ट्रॅव्हिस बार्कर यांनी २२ मे रोजी लग्न केलं होतं.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Raja Raghuvanshi Murder : “मैं खुद जाऊंगा…”, सोनमच्या भावाने घेतली राजा रघुवंशीच्या आईची भेट, दिलं ‘हे’ आश्वासन