-
नवीन वर्ष सुरू व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या आगमनासाठी सर्वच खूप उत्सुक आहेत. या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक मालिका सज्ज आहेत. यापैकी काही मालिकांचे प्रोमोही प्रदर्शित झाले असून काहींची घोषणा झाली आहे.
-
येणाऱ्या अनेक मालिका वेगळ्या धाटणीच्या असून वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांच्या मनात घर करण्यासाठी तयार आहेत. आज आपण या मालिका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
९ जानेवारी २०२३ ला नवी मालिका ‘प्रीतीचा वणवा उरी पेटला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता ही मालिका आपल्याला पाहता येईल. या मालिकेतून प्रेक्षकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सर्वांना मदत करण्यासाठी काहीही करू शकणाऱ्या मुलीची गोष्ट या मालिकेतून सांगण्यात येणार आहे.
-
मुंबईतील पोस्ट ऑफिस काळावर आधारित ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही विनोदी मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले, प्रभाकर मोरे आणि इतर अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
-
या मालिकेतून प्रेक्षकांना मुंबईतील हस्तलिखित पत्रांचा आणि पोस्ट ऑफिसचा काळ पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. त्यातच या विनोदवीरांची जुगलबंदी पाहून प्रेक्षक नक्कीच पोट धरून हसणार आहेत.
-
‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आगामी मालिका ‘रमा राघव’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत दिसायला सुंदर आणि स्वभावाने धाडसी असलेल्या रमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
रमा अतिशय धाडसी असून तिला तिचे आयुष्य तिच्या शर्तींवर जीवन जगायचे आहे. या मालिकेत आपण रमा आणि राघव यांची प्रेमकहाणी पाहणार आहोत. ही मालिका ९ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
-
‘अनाथांची आई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी आई’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच त्यांच्या दुःखद जीवनाची कहाणी दाखवण्यात येणार आहे.
-
यशोमन आपटे, मधुरा देशपांडे आणि कुंजिका काळवीट यांसारख्या लोकप्रिय कलाकारांचा बहुप्रतिक्षित टीव्ही शो ‘शुभ विवाह’ लवकरच प्रसारित होणार आहे. ही मालिका ‘भूमी’ या मुलीच्या अवतीभोवती फिरते. भूमीचे आपल्या बहिणीशी खूपच खास नाते आहे आणि टी तिच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यास तयार आहे.
-
अशातच भूमीचे लग्न एक दिव्यांग व्यक्तीशी होते आणि नंतर तिला समजले की ती मानसिकदृष्ट्याही अस्थिर आहे. १६ जानेवारी २०२३ रोजी स्तर प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होईल.
-
‘प्रतिशोध’ ही टीव्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. या मालिकेची कथा अतिशय अनोखी असून यात लोकप्रिय मराठी अभिनेता अमोल बावडेकर एका स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे आहे.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत