-
बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच टीव्ही स्टार्सही आपल्या लग्झरी लाइफमुळे सातत्याने चर्चेत असतात. हे स्टार्स मोठमोठ्या गाड्या आणि आलिशान घरांसाठीही प्रसिद्ध आहेत. आज आपण अशा काही टीव्ही स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी २०२२ मध्ये महागड्या कार खरेदी केल्या आहेत.
-
प्रसिद्ध मालिका अनुपमा फेम रुपाली गांगुली हिने यावर्षी तिच्या घरी महिंद्राच्या नवीन थारचे स्वागत केले. त्यांच्या या एसयूव्हीची किंमत सुमारे १४.१६ लाख रुपये आहे.
-
बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदनेही अलीकडेच तिच्या कार कलेक्शनमध्ये नवीन जीप कंपासचे स्वागत केले. या कारची किंमत १८.०४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २९.५९ लाख रुपयांपर्यंत जाते.
-
१८ वर्षीय अश्नूर कौरने या वर्षाच्या सुरुवातीला बीएमडब्ल्यू एक्स3 खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कार देखो वेबसाइटनुसार, ही २०१६ ची मॉडेल आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत आता ४० लाख रुपये आहे.
-
वेगवेगळ्या वाहनांची आवड असलेला टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्रा याने नुकतीच नवीन जीप रँग्लर रुबिकॉन खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कारची एक्स-शोरूम किंमत ६०.३० लाख रुपये आहे.
-
टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीनने यावर्षी तिच्या घरी एका नवीन आलिशान मर्सिडीज कारचे स्वागत केले होते. तिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार खूप महाग आहे. रिपोर्ट्सनुसार, या आलिशान कारची किंमत ६२ लाख रुपयांपासून सुरू होते.
-
अभिनेत्री अवनीत कौर हिने यावर्षी स्वतःला ८७ लाख रुपयांची रेंज रोव्हर वेलार भेट दिली आहे.
-
बिग बॉस फेम राकेश बापटने फेब्रुवारी २०२२ मध्ये एक शानदार नवीन ऑडी Q7 खरेदी केली. त्यांच्या आलिशान कारची किंमत ८२.४९ लाख ते ९० लाख रुपये आहे.
-
बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाशने या वर्षी एप्रिलमध्ये तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q7 चा समावेश केला. कार देखो वेबसाइटच्या मते, संपूर्ण भारतात ऑडी Q7 ची एक्स-शोरूम किंमत ८२.४९ लाखांपासून सुरू होते आणि ९० लाखांपर्यंत जाते.
-
विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकने या वर्षी जानेवारीमध्ये नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलई खरेदी केली होती. कार देखो वेबसाइटनुसार, या एसयूव्हीची किंमत ८५.८० लाख रुपयांपासून सुरू होते आणि १.२५ कोटी रुपयांपर्यंत जाते.
-
(All Photos: Social Media)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश