-
अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.
-
राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्राणीशी मे २०२२ मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. मात्र याची माहिती आता समोर आली आहे.
-
‘बिग बॉस मराठी ४’मधून बाहेर पडल्यानंतर राखीने ७ महिन्यांपूर्वीच आदिलशी कोर्ट मॅरेज आणि निकाह केल्याचं मान्य केलं.
-
राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात हा आदिल खान नेमका कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
आदिल खानच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तो एक बिझनेसमन असून तो कर्नाटकच्या ‘युज्ड कार्स’चा मॅनेजिंग डायरेक्टर आहे.
-
आदिल खानकडे बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री आहे.
-
२००७ साली त्याने ‘डेझर्टलॅब’ नावाचं एक आईसक्रीम पार्लर आणि कार्सचा बिझनेस सुरू केला.
-
याशिवाय त्याने अनेक राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
-
आदिलचे इन्स्टाग्रामवर ४४ हजार फॉलोअर्स आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवर एक नजर टाकल्यास तो फिटनेस फ्रिक असल्याचं दिसून येतं.
-
आदिलकडे बऱ्याच लग्झरी कार्सचं कलेक्शन आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर कार्सचे बरेच फोटो आहेत.
-
राखीने आदिलला डेट करायला सुरुवात केल्यानंतर त्याने तिला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती.
-
दरम्यानच्या काळात आदिलने राखीबरोबर दुबईमध्ये एक घर खरेदी केल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
-
‘एबीपी’च्या वृत्तानुसार राखी सावंतच्या अगोदर आदिल खान मॉडेल रोशीना डेलीव्हरीला डेट करत होता.
-
आदिल खान आणि राखी सावंत यांनी मागच्या वर्षी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली.
-
त्याआधी राखीने बिग बॉस १५ मध्ये रितेशला आपला पती म्हणून मीडिया समोर आणलं होतं. मात्र नंतर ते दोघं वेगळे झाले.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल