-
दिविता राय मिस इंडिया २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
-
आतापर्यंत सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू या खिताबाच्या मानकरी ठरल्या आहेत.
-
मिस युनिव्हर्सचा ७१वा ग्रँड फिनाले १५ जानेवारी रोजी अर्नेस्ट एन मोरिअल कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे.
-
जगभरातील ८५ सुंदरींमध्ये भारताच्या दिविताचाही समावेश आहे.
-
तर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी दिविता राय कोण आहे? हे जाणून घेऊयात.
-
दिविताचा एक लूक व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सोन्याच्या पक्ष्यासारखी वेशभूषा करून स्टेजवर पोहोचली होती.
-
तिने फॅशन डिझायनर अभिषेक शर्माचा पोशाख कॅरी केला होता.
-
एक काळ असा होता जेव्हा भारतात सुवर्णयुग होतं असं म्हटलं जायचं आणि दिविताने तसाच लूक केला होता.
-
दिविताच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर दिविता राय कोण आहे, याची चर्चा सुरू झाली.
-
२३ वर्षीय दिविता राय ही कर्नाटकची आहे.
-
तिने २८ ऑगस्ट २०२२ रोजी मिस युनिव्हर्स इंडिया २०२२ चे विजेतेपद पटकावले होते.
-
तिने मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये देखील भाग घेतला होता आणि ती दुसरी उपविजेती होती. तेव्हा हरनाज सिंधूने तो ताज पटकावला होता.
-
दिविता एक आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे.
-
तिने मुंबईतील सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केले आहे आणि ती मॉडेलिंगही करते.
-
याशिवाय तिला बॅडमिंटन, बास्केटबॉल, चित्रकला, गाणी ऐकणं व वाचनाची खूप आवड आहे.
-
सप्टेंबर २०२१ मध्ये दिविता रायने कॅन्सरचा उपचार घेऊ न शकलेल्या मुलांसाठी चाइल्ड-हेल्प फाउंडेशनसाठी निधी उभारला.
-
मौखिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी तिने डेंटल किटचेही वाटप केले होते.
-
(सर्व फोटो – दिविता राय इन्स्टाग्राम)

Sir J J Hospital Doctor Suicide: ‘घरी जेवायला येतो’ असं आईला सांगितलं, घरी जाताना डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; आत्महत्येचं कारण आलं समोर