-
गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत.
-
तिने तिच्या लग्नाचे काही फोटोही शेअर केले होते.
-
मात्र त्यानंतर आदिलने राखीबरोबरच्या लग्नाला दुजोरा देण्यास टाळाटाळ केली होती.
-
अखेर आता आदिलने एक पोस्ट शेअर करत लग्नाची कबुली दिली आहे.
-
त्याबरोबर त्याने राखीबरोबरच्या लग्नाची कबुली देण्याबद्दल टाळाटाळ का केली याबद्दलचे स्पष्टीकरणही दिले आहे.
-
राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे.
-
त्या दोघांचा निकाह २९ मे २०२२ ला झाला असून त्यांनी २ जुलै २०२२ ला लग्नाचे रजिस्ट्रेशन केले होते.
-
राखी आणि आदिल एकमेकांना गेल्या वर्षभरापासून डेट करत आहेत.
-
नुकतंच आदिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर राखीबरोबरच्या लग्नाचा एक फोटोही शेअर केला आहे.
-
या फोटोत ते दोघेही गळ्यात वरमाला घालून उभे असल्याचे दिसत आहे.
-
यावेळी राखी अगदी नववधूप्रमाणे नटल्याचे दिसत आहे.
-
याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
“अखेर आता मी एक मोठी घोषणा करत आहे.”
-
“मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटलं नव्हतं.”
-
“पण मला काही गोष्टी हाताळायच्या होत्या म्हणून मी शांत होतो.”
-
“पण राखी आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. (पप्पुडी)”, असे आदिलने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
-
यावेळी आदिलने त्याच्या लग्नाबद्दल घोषणा न करण्यामागे काही वैयक्तिक कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.
-
आदिलने ‘मला काही गोष्टी हाताळायच्या होत्या, म्हणून मी शांत होतो’, असे कारण यावेळी सांगितले आहे.
-
आदिलच्या या पोस्टवर राखी सावंतनेही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
-
‘धन्यवाद जान, खूप खूप प्रेम’, असे तिने कमेंट करताना म्हटले आहे.
-
त्याबरोबर राखीने प्रेम व्यक्त करणारे तीन इमोजीही शेअर केले आहेत.
