-
अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
-
एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे.
-
या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
-
या महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता.
-
यासंदर्भात संबंधित मॉडेलनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
-
अभिनेत्री शर्लिन चोप्रा यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे.
-
आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे.
-
काल राखी सावंतनं यांसदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
-
मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला, अशी माहिती शर्लिन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.
-
राखी सावंतच्या या प्रकरणानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रा कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-
शर्लिन चोप्रा ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे.
-
ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
तिचे सोशल मीडिया लाखो फॉलोअर्स आहेत.
-
शर्लिन चोप्राला तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी ओळखले जाते.
-
शर्लिन चोप्राचा जन्म ११ फेब्रुवारी १९८४ रोजी हैदराबाद येथे झाला आहे.
-
तिचे खरे नाव मोना चोप्रा असे आहे.
-
शर्लिनचे प्राथमिक शिक्षण स्टैनली गर्ल्स हायस्कूल याठिकाणी झाले आहे.
-
त्यानंतर तिने सिकंदराबादमधील सेंट अॅन्स कॉलेज फॉर वुमन या ठिकाणी शिक्षण घेतले आहे.
-
शर्लिन चोप्राने २००५ मध्ये ‘टाइमपास’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये बोल्ड आणि सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.
-
शर्लिन ही दिग्दर्शक रुपेश पॉलच्या कामसूत्र 3D या इंग्रजी चित्रपटाची मुख्य नायिका होती.
-
मोठ्या पडद्याबरोबरच शर्लिनही छोट्या पडद्यावरही सक्रिय आहे.
-
शर्लिन ही कलर्स मराठीच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त शो बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात झळकली होती.
-
याशिवाय ती एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला शोमध्येही दिसली आहे.
-
शर्लिन चोप्रा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जिने प्लेबॉय या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते.

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम