-    अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. 
-    आता हे बहुचर्चित कपल विवाहबंधनात अडकलं आहे. 
-    आज ४.३० वाजता अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. 
-    लवकरच हे दोघंही प्रसार माध्यमांसमोर येणार आहेत. 
-    त्याचपूर्वी सुनील शेट्टीचा लेकीच्या लग्नामधील लूक समोर आला आहे. 
-    सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा पार पडला. 
-    अगदी मोजक्याचा लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. 
-    विशेष म्हणजे लेकीच्या लग्नासाठी सुनील शेट्टीने केलेला लूक अगदी लक्षवेधी ठरला. 
-    त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याचा साधेपणा दिसून आला. 
-    लुंगी, कुर्ता सुनील शेट्टीने परिधान केला होता. तसेच त्यावर त्याने माळ घातली होती. 
-    इतकंच नव्हे तर पायामध्ये कोल्हापूरी चप्पल सुनील शेट्टीने घातली. तर अहान शेट्टीचाही लूक चर्चेचा विषय ठरला. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम. इन्स्टंट बॉलिवूड) 
 
  Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  