-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे.
-
तिने तिच्या लग्नाबद्दल आतापर्यंत अनेक खुलासे केले आहेत.
-
आता प्राजक्ताने ती लग्न करायला अजूनही का तयार होत नाही? यामागचे कारण सांगितले आहे.
-
“आपल्या हिंदू संस्कृतीत लग्नाला फार मोठं मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे.”
-
“लग्न ही व्यवस्था खूपच चांगली आहे, हे मी मान्य करते.”
-
“पण आपल्या कुटुंबापेक्षा समाज भान जास्त असणाऱ्यांसाठी ती व्यवस्था उपयोगाची नाही.”
-
“सामाजिक कार्यकर्ते, काही कलाकार, चित्रकार जे सतत काही तरी वेगळा विचार करत असतात.”
-
“त्यांना आपल्या कुटुंबावर अन्याय करायचा नसतो. ते संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानतात.”
-
“एखादी स्त्री अशी असेल तर तिच्याबाबतीत लग्न हे थोडं अवघड ठरु शकतं.”
-
“जर पुरुष असा असेल तर बायको ते सहन करु शकते.”
-
“त्यामुळे मी लग्न केलं तर समोरच्या व्यक्तीवर प्रचंड अन्याय करेन. कारण मला समाजकार्यात प्रचंड रस आहे.”
-
“मी घरात फार कमी वेळ असते. मला सतत काही ना काही तरी करायचं असतं.”
-
“पण मी लग्नाला कधीच नाही म्हटलेलं नाही.”
-
“कारण मी नाही म्हणायची आणि देव म्हणेल, अच्छा ओके, नाही करायचं का आता पाहुया.”
-
“जर हो म्हटलं तरीही देव म्हणेल की बरं आता करायचं का?, पाहूया”
-
“या दोन्हीही गोष्टींमुळे मी लग्नाबद्दल काहीही ठरवत नाही.”

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल