-
गायक अदनान सामी मूळचा पाकिस्तानी आहे, पण त्याने भारतीय नागरिकत्व घेतलं आणि तो भारतात राहतो.
-
भारतावर प्रेम असल्याने आपण नागरिकत्व स्वीकारलं असं अदनान म्हणत असतो, पण आता त्याच्या भावाच्या एका दाव्याने मात्र खळबळ उडाली आहे.
-
त्याचा भाऊ जुनैद सामी खानने एक पोस्ट शेअर करत अदनानवर गंभीर आरोप केले आहेत.
-
“अदनानला माहीत होते की मी प्रतिभावान आहे आणि गाणे गाऊ शकतो. पण त्याने कधीच माझी काळजी केली नाही.”
-
“तो स्वार्थी आहे. मला त्याने भारतात कधीच लाँच केले नाही. अदनानला भीती होती की मी त्याच्यापेक्षा चागलं काम करेन.”
-
“आता मी घरी बसून काही करत नाही. माझ्याकडे काम नाही याला अदनान जबाबदार आहे,” असंही जुनैदने म्ह्टलंय.
-
जुनैदने आपल्या भावाच्या वैयक्तिक आयुष्यावरही लिहिले आहे.
-
जुनैदने पोस्टमध्ये लिहिले की अदनानचा जन्म १५ ऑगस्ट १९६९ रोजी रावळपिंडी येथील रुग्णालयात झाला होता.
-
माझाही जन्म १९७३ मध्ये याच हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा खोटा आहे, असंही जुनैदने म्हटलंय.
-
त्याने २००७-०८ मध्ये दुसरी पत्नी सबा गलादेरीच्या पॉर्न डीव्हीडी बनवल्या. पती-पत्नीमधील गोष्टी फक्त आपापसातच ठेवल्या जातात.
-
अदनानने या डीव्हीडी कोर्टाला दिल्या होत्या. हे व्हिडीओ सबाच्या बॉयफ्रेंडने बनवल्याचा दावा अदनानने कोर्टात केला होता, पण ते सगळं खोटं आहे, असा दावाही जुनैदने केला.
-
(सर्व फोटो – अदनान सामी इन्स्टाग्राम)

अमेरिकेकडून भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू; ट्रम्प म्हणाले, ‘रशियाबरोबर व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार’