-
अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार.
-
सध्या तो त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
-
या चित्रपटाच्या पहिल्या भागाने त्याला एक वेगळी ओळख दिली.
-
तर त्याचबरोबर त्याचा चाहतावर्गदेखील खूप वाढला.
-
आज तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे.
-
‘पुष्पा २’साठी देखील त्याने मोठं मानधन आकारल्याचं समोर आलं आहे. अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’साठी प्रचंड मेहनत घेत आहे.
-
‘पुष्पा’ चित्रपट तुफान हिट झाल्यानंतर ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन आकारलं आहे.
-
या चित्रपटात पुन्हा एकदा ‘पुष्पाराज’ ही भूमिका साकारण्यासाठी अल्लू अर्जुनने तब्बल ८५ कोटी फी घेतली आहे. इतकी मोठी रक्कम एका चित्रपटासाठी आकारून त्याने दक्षिणात्य सिनेसृष्टीत एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.
-
पण अद्याप अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील मानधनाबाबत निर्मात्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case