-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अभिनेता वैभव तत्त्ववादीला ओळखले जाते.
-
मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
वैभव तत्त्ववादी हा सध्या त्याच्या ‘सर्किट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव तत्त्ववादीने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत त्याने चित्रपटाशिवाय, त्याचे खासगी आयुष्य, डाएट याबद्दलही भाष्य केले.
-
यावेळी वैभवला मराठी सिनेसृष्टीतील तुझं क्रश कोण? याबद्दल विचारणा केली.
-
त्यावेळी त्याने लाजत लाजत उत्तर दिले.
-
“आता माझं सिनेसृष्टीत कोणीही क्रश नाही.”
-
“सर्वजण आता माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.”
-
“मी एका लग्नाची गोष्ट हे मराठीतील पहिलं नाटक पाहिलं होतं.”
-
“त्यात अभिनेत्री कविता लाड या ज्या पद्धतीने स्टेजवर येतात आणि प्रशांत दामले हे ती परी अस्मानीची असं गातात.”
-
“तुम्ही ९० च्या काळात जन्मलेल्या कोणालाही हा प्रश्न विचारला तर तेही सांगतील की त्यांच्यासाठी पहिला क्रश हा तोच होता.”
-
“माझ्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील पहिला क्रश हा कविता ताईच आहेत.”
-
“मी त्यांना ताई म्हणतो, पण अजूनही त्या भेटल्या की त्यांना सांगतो की तुम्ही माझ्या पहिल्या क्रश आहात.”
-
“तुम्ही कायमच माझ्या पहिल्या क्रश राहाल”, असे वैभव तत्त्ववादी म्हणाला.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय