-
अभिनेत्री विशाखा सुभेदारने आजवर प्रेक्षकांना तिच्या विविध भूमिकांच्या माध्यमांतून खळखळून हसवलं.
-
‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमांमधून तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिवाय मराठी मालिकांमध्येही तिने साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या.
-
विशाखा नाटकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या ती तिच्या नाटकासाठी परदेशात आहे.
-
विशाखा, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आदी कलाकार ‘कुर्रर्रर्र’ नाटकासाठी परदेशात गेले आहेत.
-
अमेरिकेमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. यासर्वांनी नाटकादरम्यानचे तसेच प्रवासातील काही फोटोही शेअर केले आहेत.
-
या कलाकारांनी मुंबई विमानतळावरचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. यावेळी सर्व कलाकारांचे कुटुंबीय त्यांना सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते.
-
दरम्यान, सर्वांनी कुटुंबियांबरोबर खूप फोटो काढून त्यांना भावुक निरोप दिला.
-
विशाखाने शेअर केलेल्या एका फोटोंमध्ये ती व नम्रता कपड्यांना इस्त्री करताना दिसत आहे.
-
तर नाटकामधील इतर कलाकार नाटकाची तयारी करताना दिसत आहे. या कलाकारांना स्वतःची कामं स्वतःच करावी लागत आहे.
-
दरम्यान ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकातून आई होण्याचा संवेदनशील विषय अगदी विनोदी पद्धतीने मांडण्यात येत आहे.
-
आईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. याच भावनेतून हे नाटक रंगमंचावर साकारण्यात आलं.
-
सर्व फोटो : Instagram

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार