-
‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
-
यामध्ये पहिल्यांदाच लोकांनी आलिया भट्टला शास्त्रीय नृत्य करताना पाहिले.
-
या गाण्यात माधुरी दीक्षितही होती. या गाण्याचे बजेट ७ कोटी रुपये होते.
-
आमिर खान आणि कतरिना कैफच्या ‘धूम ३’ चित्रपटातील ‘मलंग’ गाणे चांगलेच गाजले
-
या गाण्याच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी सुमारे ५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
गाण्यासाठी २०० हून अधिक व्यावसायिक जिम्नॅस्ट्सना सामील करण्यात आले होते.
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटातील ‘किलीमांजारो’ हे गाणे पेरूमधील माचू पिचू येथे चित्रित करण्यात आले.
-
चित्रपटातील हे गाणे चित्रित करण्यासाठी निर्मात्यांना ४ कोटी रुपये खर्च करावे लागले.
-
हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले.
-
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घूमर घूमर’ हे गाणे तयार करण्यात संजय लीला भन्साळी यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
-
यासाठी भव्य सेटसोबतच दीपिका ते बॅकग्राउंड डान्सर्सशी संबंधित प्रत्येक खास गोष्टीचीही काळजी घेण्यात आली होती.
-
गाण्यांच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘बॉस’ या चित्रपटातील ‘पार्टी ऑल नाईट’ या गाण्याचे बजेट ६ कोटी रुपये होते.
-
यो यो हनी सिंगने या गाण्यात रॅप केले आहे.
-
या गाण्यात ६०० परदेशी मॉडेल्सनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून परफॉर्म केले.
-
शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ गाणे चांगलेच गाजले.
-
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या गाण्यासाठी भव्य सेट लावला होता.
-
चित्रपटाच्या कोरिओग्राफर सरोज खानच्या म्हणण्यानुसार, गाण्याच्या शूटिंगवर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
शाहरुख खानचा चित्रपट ‘रावन’ मधील ‘छमक छल्लो’ हे गाणेही चांगलेच गाजले
-
हे गाणे हॉलिवूड गायक एकोनने गायले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्याचे बजेट ३ कोटी होते. (स्रोत: स्क्रीन शॉट)

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात