-
शहनाज गिल नेहमीच तिच्या लुकने प्रभावित करत असते. चित्रपटाचे प्रमोशन असो, इतर आउटिंग असो किंवा फॅशन शो असो, शहनाज या सगळीकडे प्रसिद्ध होत आहे. सलमान खान-स्टार ‘किसी का भाई किसी की जान’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने अलीकडेच बिग बॉस 13 मधील एक वाईट अनुभव शेअर केला आहे. त्या घटनेनंतरच तिने स्वतःवर काम केलं असं ती म्हणाली. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
बिग बॉस १३ मध्ये शहनाज गिलला प्रसिद्धी मिळाली. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
तिचा स्वतःचा टॉक शो, Desi Vibes With Shehnaaz Gill देखील आहे. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शहनाजने सलमान खानने होस्ट केलेल्या शोमध्ये तिला तिच्या शररीराची लाज वाटल्याचं तिने सांगितलं. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
पीटीआयशी बोलताना शहनाज गिल म्हणाली की, “मी स्वत:ला बदलले, स्वत:वर काम केले. जेव्हा लोकांनी मला चांगले सल्ले दिले, तेव्हा मी ते पाळले आणि सुधारले. मी वजन कमी केले कारण मी ‘बिग बॉस’मध्ये जाड दिसण्याबद्दल अनेकांनी माझ्यावर टीका केली. त्यामुळे मला माझ्या शरीराची लाज वाटली..” (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
ती पुढे म्हणाली, “मग मी माझी शैली बदलली कारण लोकांना वाटेल की मी फक्त सलवार सूट घालू शकते. मी या सर्व पूर्वकल्पना मोडून काढल्या आणि पुढेही असेच करत राहीन.” (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
शहनाज गिलच्या टॉक शो देसी वाइब्सच्या अलीकडील भागादरम्यान, जेव्हा अभिनेत्याने हिप हॉप कलाकार हनी सिंगला होस्ट केले तेव्हा दोघांनी त्यांच्या फिटनेस प्रवासाबद्दल खुलासा केला. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
हनी सिंगने शहनाजला सांगितले की, तिचे रुपांतर होण्यापूर्वी ती खूप चांगली दिसत होती. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
दुसरीकडे, शहनाजने शेअर केले की जेव्हा एखादी व्यक्तीचं वजन जास्त असतं तेव्हा तेव्हा त्यांना या उद्योगात काम मिळणे कठीण होतं. (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
-
मात्र, ती एका चित्रपटासाठी वजन वाढवण्यास तयार असल्याचेही तिने सांगितले. शहनाज म्हणाली, “जर मला वजन वाढवायचे असेल तर मी ते करू शकते. पण तो खूप मोठा प्रोजेक्ट असेल तरच.” (फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला