-
‘सैराट’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाने संपूर्ण देशाला मराठी मनोरंजन विश्वाकडे लक्ष देण्यास भाग पाडले.
-
२९ एप्रिल २०१६ला प्रदर्शित झालेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजवली.
-
चित्रपटाची कथा आणि अजय-अतुलच्या गाण्यांनी इतर भाषिक प्रेक्षकांनाही आपल्या तालावर नाचवले. त्या वर्षी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
-
‘सैराट’ या चित्रपटातून जातीभेद आणि समाजाचं वास्तव दाखवण्यात आलं होतं.
-
या चित्रपटातूनच आकाश ठोसर व रिंकू राजगुरूने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.
-
या चित्रपटातील परश्या व आर्चीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
आज २९ एप्रिल २०२३ ला या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसरने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खास पोस्ट केल्या आहेत.
-
‘सैराट’ या चित्रपटाने आकाश व रिंकूला लोकप्रियता मिळवून दिली. पहिल्याच चित्रपट सुपरहिट ठरल्याने हे दोन्हीही नवीन कलाकार प्रसिद्धीझोतात आले.
-
आजही प्रेक्षक आकाश आणि रिंकूला त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा परश्या व आर्ची याच नावाने ओळखतात.
-
प्रेक्षकांचे अजूनही त्यांच्या लाडक्या ‘परश्या’ आणि ‘आर्ची’वर तितकंच प्रेम आहे.
-
सर्व फोटो : अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS