-
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
-
केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असून, त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले.
-
काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
-
‘द काश्मीर फाइल्स’ची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.
-
चित्रपटाची कथा काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. मु
-
स्लिम समाजाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
-
‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणे वादात सापडले होते.
-
गाण्यातील शाहरुख खानचा हिरवा शर्ट आणि दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीचा रंग वादग्रस्त असल्याचे बोलले जात होते.
-
अनेक राजकीय पक्षांनी याला लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे म्हटले आणि त्यात बदल करण्याची मागणी केली.
-
‘पद्मावत’चा संपूर्ण वाद हा राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजीच्या घटनांबाबत होता.
-
राजस्थानच्या करणी सेनेसह काही संघटनांनी आरोप केला होता की संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटात अलाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांचे प्रेमप्रकरण दाखवून राजपूत समाजाचा अपमान केला आहे.
-
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करणी सेनेने भन्साळींवर हल्लाही केला होता. ट्रेलर बाहेर येताच करणी सेनेने ठिकठिकाणी त्याचा निषेध करत तोडफोड केली.
-
‘पीके’ चित्रपटात आमिर खानच्या न्यूड सीनवरून गदारोळ झाला होता.
-
आमिर खानच्या ‘न्यूड’ पोस्टरमुळे हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरू संतापले होते.
-
चित्रपटात आमिर खानबरोबर अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती
-
2013 साली केदारनाथच्या आपत्तीवर बनलेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला रिलीजपूर्वी अनेक वादांना सामोरे जावे लागले होते.
-
‘केदारनाथ’ चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकामधील वादापासून ते लव्ह जिहादपर्यंत या चित्रपटाला अनेक वादांना सामोरे जावे लागले.
-
या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानने मुख्य भूमिका साकारली होती.
-
‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.
-
त्यावरून काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी गदारोळ केला होता.
-
या वेब सीरिजच्या एका दृश्यात नवाजुद्दीन सिद्दीकी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना शिवीगाळ करताना दिसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
-
ड्रग्जच्या मुद्द्यावर बनलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाला पहिला आक्षेप त्याच्या नावावर होता, त्यात पंजाब हा शब्द जोडण्यात आला होता.
-
या चित्रपटामुळे पंजाबची प्रतिमा खराब होऊ शकते, असे सांगत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.
-
चित्रपटातून पंजाब, राजकारण आणि निवडणुका काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. या चित्रपटावरून पंजाबमध्ये बरेच राजकारण झाले होते.
-
‘तांडव’ वेब सिरीज रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडली होती.
-
या मालिकेवर हिंदू देवी-देवतांचा अपमान तसेच जातीयवादी टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
-
दुसरीकडे भाजपच्या एका आमदाराने अॅमेझॉन प्राइमविरोधात नाराजी व्यक्त करत ‘जूता मारो अभियान’ सुरू केले होते.
-
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाने वादांमुळे बरेच लक्ष वेधले होते.
-
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला कारण त्यात अनेक सेक्शुअल अॅक्ट सीन्स आहेत.
-
यासोबतच चित्रपटात मोठ्या प्रमाणात शिवीगाळही करण्यात आली आहे.
-
प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजचा तिसरा सीझन वादाच्या भोवऱ्यात सापडाला होता.
-
यामध्ये हिंदू धर्माचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे, करणी सेना आणि बजरंग दलाने म्हटले आहे. असा आरोप
-
यानंतर संतप्त लोकांनी भोपाळमध्ये सेटची तोडफोड केली आणि प्रकाश झा यांच्यावर शाईही फेकली.

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?