-
दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या खास शैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
-
ती तिच्या अभिनयासोबतच साधेपणासाठीही ओळखली जाते. साई अगदी कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिने ‘लव्ह स्टोरी’ सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.
-
आज ९ मे रोजी साईचा ३१ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण तिच्या लव्हलाइफबद्दल एक जबरदस्त किस्सा जाणून घेणार आहोत.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री सई पल्लवी हिचा जन्म १९९२ मध्ये कोटागिरी येथे झाला. कमी वयात आणि अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ती नावारूपाला आली.
-
साईने २०१५ मध्ये मल्याळम चित्रपट ‘प्रेमम’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये समीक्षकांनी त्यांचे खूप कौतुक केले.
-
साई पल्लवीने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘लव्ह स्टोरी’, ‘श्याम सिंघा रॉय’, ‘गार्गी’, ‘मारी 2’ आणि ‘अथिरन’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
-
चित्रपटांबरोबरच साई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही विशेष चर्चेत असते.
-
‘माय व्हिलेज’ या कार्यक्रमात साई पल्लवीने स्वतःची प्रेमकहाणी सांगितली होती. यावेळी तिने सांगितली की लहानपणीच तिचे प्रेमपत्र तिच्या घरच्यांच्या हाती लागले होते.
-
साईने ते प्रेमपत्र एका मुलासाठी लिहिले होते. पण, साईच्या घरच्यांना हे पत्र सापडले आणि त्यांनी साईला चांगलाच मार दिला होता.
-
तिच्या बालपणीची गोष्ट आठवत साईने सांगितले की, ‘जेव्हा ती सातव्या वर्गात शिकत होती, त्यावेळी तिने एका मुलासाठी प्रेमपत्र लिहिले होते. मात्र तिच्या घरच्यांनी तिला रंगेहात पकडले. यानंतर तिला चांगलाच मार मिळाला.
-
खूप कमी लोकांना माहीत असेल की अभिनेत्री बनण्याआधी साई एक डॉक्टर होती. तिला हृदयरोगतज्ज्ञ व्हायचे होते. तिने मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशनची पदवीदेखील घेतली आहे.
-
याशिवाय साई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘गार्गी’ चित्रपटात दिसली होती. तो एक तमिळ चित्रपट होता. (सर्व फोटो : साई पल्लवी/इन्स्टाग्राम)

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली