-
काही दिवसांपूर्वीच आलेल्या पठाण या सिनेमावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता. या सिनेमात शाहरुख आणि दीपिका मुख्य भूमिकेत होते. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस )
-
दीपिकाची भगवी बिकिनी आणि बेशरम रंग गाणं या दोहोंवरून वाद झाला. मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केली.
-
या यादीतला पुढचा सिनेमा आहे द कश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून कसं हाकलण्यात आलं, जे राहिले त्यांच्या हत्या कशा करण्यात आल्या? असा सिनेमाचा विषय होता. या सिनेमावरूनही बरीच चर्चा झाली होती. तसंच वाद आणि आरोपही झाले. मात्र सिनेमा रिलिज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कामगिरी केली. या सिनेमाने ३०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.
-
याच यादीत पुढचं नाव घेता येईल ते बाजीराव मस्तानी या सिनेमाचं. या सिनेमावरही पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला होता. तसंच पिंगा या गाण्यावरूनही वाद झाला होता. मात्र या सिनेमानेही ३५० कोटींची कमाई केली होती.
-
बाजीराव मस्तानी या सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा संजय लीला भन्साळींनी दिग्दर्शित केला होता.
-
ज्या सिनेमावरून वाद झाले आणि त्या सिनेमांनी रिलिजनंतर रेकॉर्डब्रेक कमाई केली त्यातलाच आणखी एक सिनेमा म्हणजे पद्मावत
-
पद्मवात सिनेमावरून करणी सेनेने आंदोलन केलं होतं. तसंच दीपिकाला धमकीही देण्यात आली होती. मात्र या सिनेमात ५८० कोटींहून अधिक कमाई केली.
-
संजय लीला भन्साळीच्या रामलीला या सिनेमावरूनही वाद झाला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण होतो. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १९० कोटींहून अधिक कमाई केेली.
-
राम लीला या सिनेमाच्या नावावारूनही वाद झाला होता. ही कथा रोमिओ आणि ज्युलिएटवर बेतली होती. मात्र या सिनेमाला वादामुळे चांगलं ओपनिंग मिळालं आणि कमाईही तुफान झाली.
-
या यादीत पुढचा नंबर लागतो तो आमिरच्या पीके या सिनेमाचा. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि आमिर खान यांच्या मुख्य भूमिका होत्या.
-
हिंदू देवदेवतांची बदनामी या सिनेमातून करण्यात आल्याचा आरोप झाला. या सिनेमाने ७०० कोटींहून अधिक पैसे कमवले.
-
दंगल या सिनेमाआधी आमिरने एक वक्तव्य केलं होतं. ज्यावरून या सिनेमाच्या कलेक्शनवर परिणाम होईल असं वाटलं. मात्र या सिनेमाने १ हजार कोटींहून अधिक कमाई केली.
