-
‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या विशेष चर्चेत आहे. रातोरात अदाच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.
-
या चित्रपटात अदाने केलेल्या अभिनयावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याचबरोबर हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग महिला-प्रधान चित्रपट ठरला आहे.
-
या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कंगना रणौत, आलिया भट्ट आणि विद्या बालन सारख्या हिट अभिनेत्रींच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. अदा शर्माने कोणत्या चित्रपटांना मागे टाकून हा विक्रम केला आहे ते जाणून घेऊया.
-
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या, शशांक घोष दिग्दर्शित करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया अभिनीत ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१.३९ कोटी रुपयांची कमाई केली.
-
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या कंगना रणौत स्टारर ‘मणिकर्णिका’ या पिरियड फिल्मने बॉक्स ऑफिसवर ९२.१९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणौतसह क्रिश जगरलामुडी यांनी केले होते.
-
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भट्टच्या ‘राझी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२३.८४ कोटींची कमाई केली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट सत्यकथेवर आधारित होता.
-
२०२२ मध्ये रिलीज झालेला, आलिया भट्ट स्टारर ‘गंगुबाई’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा महिला-प्रधान बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाने १२९.१० कोटींची कमाई केली आहे.
-
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट रिलीज होऊन १० दिवस झाले आहेत. रिलीजच्या अवघ्या १० दिवसांत या चित्रपटाने एकूण १३५ कोटींची कमाई केली आहे. सोबतच अदा शर्माही सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १७५ ते २०० कोटींचा गल्ला जमवण्यात यशस्वी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

“गुजरातचे गृहमंत्री असताना तुम्हाला अटक झालेली”, काँग्रेस खासदाराने कोंडीत पकडताच अमित शाह म्हणाले…