-
मन झालं बाजिंद या मालिकेत कृष्णा हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात सध्या एका फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे.
-
श्वेताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर साडी नेसलेला एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या फोटोवर एका महिलेने “अजून खाली नेस बाई” अशी कमेंट केली होती ज्यावरून श्वेताने या महिलेची चांगलीच शाळा घेतली आहे.
-
या महिलेला टार्गेट करत श्वेता म्हणाली की “नको काकू ती तुमची स्पेशालिटी आहे, तुम्हीच नेसा. आय लव्ह यू काकू”.
-
‘काकू डोळ्यावरची आणि जमलं तर डोक्यातली सुद्धा जळमट काढा म्हणजे तुम्हालाही सुंदरता दिसेल आणि एवढा त्रास ही होणार नाही…’ असेही श्वेता पुढे म्हणाली.
-
तर दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “काही दिवसांनी असे लोक तर रस्त्यावर सेक्स करतील लोकांसमोर”.
-
यावर श्वेताने “तुमच्यासारखे म्हणायचं का तुम्हाला? कारण तुमच्या सारख्या विचारसरणीची लोक १०० टक्के करतील No doubt! मला तुमच्या घरातील स्त्रियांबद्दल खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला लहान मुलगी सुद्धा आहे. सर जरा तिच्यासाठी तरी सुधारा. तिला मोठं झाल्यावर वडील म्हणायची लाज वाटू नये याची काळजी घ्या” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
-
श्वेताला ट्रोल करणाऱ्यांवर तिचा सहकलाकार असलेल्या वैभव चव्हाणने देखील टीका केली. “अगं केसात काकूंसारखं एक फूल लावलं असत तर त्यांना नक्कीच आवडला असता फोटो.. सुंदर दिसते आहेस तू…काकू जरा जळत आहेत बाकी काही नाही.” असे वैभव चव्हाणने म्हटले आहे.
-
या फोटोवर श्वेताच्या काही चाहत्यांनी तिची पाठराखण करत तू छान दिसतेयस, यांना कंबर सोडून बाकी दिसतच नाही तुझे डोळे किती छान आहेत हे ही लोकं बघणार नाहीत अशा प्राद्धतीच्या कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवताच मोदी सरकारचा मोठा निर्णय; ३.६ अब्ज डॉलर्सच्या कराराला दिली स्थगिती