-
साऱ्या जगाला दखल घ्यायला लावणाऱ्या ‘RRR’सारख्या चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने पुन्हा त्याच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली.
-
हा चित्रपट तर लोकांनी डोक्यावर घेतलाच पण याबरोबरच ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या दोघांचा अभिनयही लोकांना प्रचंड आवडला.
-
पण तुम्हाला माहिती आहे का की ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचं लग्नदेखील शाही पद्धतीने अन् थाटामाटात झालं होतं.
-
पण तुम्हाला माहिती आहे का की ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचं लग्नदेखील शाही पद्धतीने अन् थाटामाटात झालं होतं.
-
ज्युनिअर एनटीआर आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांचा लग्नसोहळा हा आजवरचा सगळ्यात महागडा सेलिब्रिटी लग्नसोहळा म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या मीडिया रीपोर्टनुसार या लग्नसोहळ्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. लग्नाच्या मंडपासाठी अन् सजावटीसाठीच तब्बल १८ कोटी रुपये खर्च झाले होते.
-
या शाही लग्न सोहळ्याला तब्बल १५००० लोकांची उपस्थिती होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लोकांपैकी फक्त ३००० हे सेलिब्रिटी पाहुणे आणि परिवारातील काही सदस्य होते, तर १२००० लोक हे ज्युनिअर एनटीआरचे चाहते होते.
-
असं म्हंटलं जातं की ज्युनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी हिने लग्नात परिधान केलेली साडीदेखील १ कोटींची होती आणि लग्नानंतर तिने ती साडी दान केली.
-
या लग्नादरम्यान एक वादही निर्माण झाला होता, जेव्हा हे लग्नं ठरलं तेव्हा लक्ष्मीचे वय हे १७ होते आणि याबद्दल सगळीकडे चर्चा होत होती. त्यामुळे एक वर्षं थांबून ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी यांचं लग्न पार पडलं.
-
ज्युनिअर एनटीआर यांच्या लग्नाला १२ वर्षं पूर्ण झाली असून त्यांना अभय आणि भार्गव ही दोन मुलंदेखील आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल