-
अनेकदा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकार प्रेमात पडतात, काहींची लग्न होतात. तर काहींच्या बाबत प्रचंड वाद होतात. हे सर्व किस्से जेव्हा समोर येतात तेव्हा या सर्वच कलरच्या चाहत्यांना धक्का बसतो. आज सुद्धा असाच एक किस्सा चर्चेत आला आहे.
-
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सह कलाकाराला जोरात कानाखाली लगावली होती. या अभिनेत्रीनेच हा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे…
-
आरती छाबड़िया या अभिनेत्रीने एका मुलाखतीत ‘लज्जा’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेचा एक अनुभव सांगितला आहे.
-
आरतीने ‘लज्जा’ सिनेमात एक लहानशी भूमिका केली होती. यावेळी रेखा यांनी लज्जाच्या सेटवरच आरतीच्या कानशिलात लगावली होती.
-
रिपोर्ट्सनुसार, आरतीने सांगितले की रेखा यांनी कानाखाली मारताच अभिनेत्री अक्षरशः ओक्सबोक्शी रडू लागली होती
-
चित्रपटाच्या कथानुकानुसार, आरती म्हणजेच (सुषमा ठाकुर) ही रेखा (रामदुलारी) यांच्या मुलाच्या प्रेमात असते, हे कळताच ती रागात सुषमाला मारू लागते. या सीननंतरही आरती खूप रडली होती असे तिने सांगितले आहे
-
आरतीने तीन वर्षाची असल्यापासून मॉडेल म्हणून काम करणे सुरु केले होते तर २००२ मध्ये तिने ‘तुमसे अच्छा कौन’ है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
तसेच आरतीने ‘आवारा पागल दीवाना’, ‘राजा भैया’, ‘तीसरी आंख’, ‘हे बेबी’, ‘डॅडी कूल’ सारख्या बॉलीवुड चित्रपटांमध्येही काम केले होते. बॉलीवुडशिवाय आरतीने कन्नड, तामिळ व तेलुगू सिनेमामध्ये सुद्धा काम केले आहे
-
आरतीने १९९९ मध्ये ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड’ पेजेंट सुद्धा जिंकले होते.

आरोग्य विभागातील हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर २३ दिवसांनंतर मिटला!