-
प्रभू देवा यांची दुसरी पत्नी हिमानी सिंगने नुकतचं एका मुलीला जन्म दिला आहे.
-
५० व्या वर्षी प्रभू देवा पुन्हा वडील झाला आहे.
-
करिअरप्रमाणेच प्रभूदेवाचे खासगी आयुष्यही नेहमी चर्चेत असते.
-
प्रभू देवाचे पहिले लग्न १९९५ मध्ये रामलथ उर्फ लतासोबत झाले होते.
-
या दोघांना विशाल, ऋषी राघवेंद्र देव आणि आदित देव हे तीन मुले झाली.
-
२००८ मध्ये कॅन्सरमुळे विशालचा मृत्यू झाला.
-
२०१० मध्ये प्रभू देवाने नयनतारासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती.
-
नयनतारा आणि प्रभूदेवा लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. हे प्रकरण प्रभूदेवाची पत्नी लता यांच्यापर्यंत पोहोचल्यावर गोंधळ उडाला होता.
-
प्रभू देवा आणि त्यांची पहिली पत्नी रामलथ यांचा विवाह १६ वर्षानंतर २०११ मध्ये घटस्फोट झाला.
-
दुसरीकडे, प्रभू देवा नयनताराबरोबर ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
-
पण २०१२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
-
२०२० मध्ये पुन्हा प्रभू देवाने फिजिओथेरपिस्ट डॉ. हिमानी सिंह यांच्याशी लग्न केले.
-
पाठदुखीच्या तक्रारीनंतर प्रभू देवा फिजिओ सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी गेले तेव्हा दोघांची भेट झाली.
-
हिमानी सिंह प्रभू देवावर उपचार करत होत्या. दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
२०२० मध्ये प्रभू देवाने हिमानीसह गूपचूप लग्नगाठ बांधली

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक