-
Rainy Season: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘अवनी’ म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने ‘My Favorite Season Is Here’ म्हणत पावसात भिजतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
-
लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी लोणावळा परिसरातील टायगर पॉईंटजवळ मनसोक्त पावसात भिजली.
-
‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथने इन्स्टाग्रामवर पावसात भिजतानाचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले.
-
लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेने पावसाचा मनमुराद आनंद लुटला.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पावसात भिजत मका खाण्याचा आस्वाद घेतला.
-
झी मराठीवरील ‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री श्वेता खरातने भर पावसात रस्त्यावर डान्स केला.
-
मराठमोळ्या अभिनेत्रींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना आज, गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
-
मुंबईसह पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, ठाणे, पालघर, नाशिक, वर्धा आणि यवतमाळ या नऊ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत