-
बाईपण भारी देवा मधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर मराठी चित्रपटांची ताकद सिद्ध झाली आहे.
-
बाईपण भारी देवा सिनेमाच्या यशाचे श्रेय सर्व अभिनेत्रींच्या बारकाईने साकारलेल्या पात्रांना जाते असे म्हणायला हवे.
-
कोट्यवधींची कमाई करणारा बाईपण भारी देवा आता वेड चित्रपटाचे रेकॉर्ड सुद्धा मोडत आहे
-
फक्त अभिनयच नव्हे तर त्यांच्या कपड्यांमधून सुद्धा विशेष महत्त्वाचे अर्थ अधोरेखित करण्यात आले आहेत. वेशभूषाकार युगेशा ओमकार हिने इंस्टाग्राम अकाउंटवर प्रत्येक पात्राच्या कपड्यांविषयी माहिती दिली आहे
-
युगेशाने दीपा परब- चौधरी म्हणेजच चारुच्या पात्रासाठी वापरलेल्या कुर्तींविषयी खास माहिती दिली आहे.
-
ती म्हणते की, चारू हे पात्र खूपच बंदिस्त आहे, ती कधीच कोणासमोर मोकळी होत नाही म्हणूनच बहुतांश कपडे हे बंद गळ्याचे आहेत.
-
शिवाय चारू ही आर्थिक दृष्टीने सक्षम आहे, ती नवऱ्यालाही सांभाळतेय म्हणजेच ती ‘मॅन ऑफ द हाऊस’ आहे. म्हणूनच तिला कॉलरचे कुर्ते देण्यावर भर दिला आहे.
-
चारू या पात्रावर अगोदरच इतक्या प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या की वेगळी एक ओढणी किंवा स्कार्फ सांभाळायला तिला परत कष्ट घेण्यासाठी वेळ नाही.
-
म्हणूनच दीपाला म्हणजेच चारूला मोजकेच दोन ब्रेसलेट आणि साधी ज्वेलरी देण्यात आली होती

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल