-    ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. 
-    ते पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले 
-    पोलिसांनी निधनाची माहिती दिल्यानंतर त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनी तळेगाव दाभाडेला पोहोचला आहे. 
-    रवींद्र महाजनी हे मागच्या ७-८ महिन्यांपासून एकटेच राहायचे, अशी माहिती समोर आली आहे. 
-    वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच गश्मीर त्यांचा मृतदेह असलेल्या रुग्णालयात पोहोचला. 
-    गश्मीरबरोबर त्याचा मित्र व अभिनेता श्रीकर पित्रेदेखील आहे. 
-    तो गश्मीरबरोबर रुग्णालयात आला. 
-    रुग्णालयात तो गश्मीरला सांभाळताना दिसला. 
-    रवींद्र यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. 
-    शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. 
-    नंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 
-    (फोटो सौजन्य- सोशल मीडिया व लोकसत्ताचे प्रतिनिधी कृष्णा पाचांळ) 
 
  टीम इंडियाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक! भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, जेमिमा ठरली विजयाची हिरो 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  