-
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपट १९ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला.
-
‘दुनियादारी’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने चांगले यश मिळवले.
-
‘दुनियादारी’ला १० वर्ष पूर्ण झाल्याने चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या सई ताम्हणकरने यातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘दुनियादारी’ चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
-
सईने या चित्रपटात ‘शिरीन’ या पात्राची भूमिका साकारली होती.
-
चित्रपटाचे कथानक प्रसिद्ध मराठी साहित्यिक सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ कादंबरीवर आधारित होते.
-
‘दुनियादारी’ चित्रपटाला तरुणपिढीची विशेष पसंती मिळाली.
-
चित्रपटातील बरेच संवाद आणि सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत.
-
सईने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी कमेंट करून “पुढचा भाग कधी येणार? लवकरात लवकरत रिलीज करा” अशी मागणी करत आहेत.
-
‘दुनियादारी’ चित्रपटात प्रेक्षकांना रेट्रो फॅशन पाहायला मिळाली होती.
-
चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्याने कलाकारांनी पुन्हा एकदा रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Operation Sindoor: ‘जशास तसं उत्तर…’ ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट; भारत-पाकिस्तान तणावावर मोठं विधान!