-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
बॉलीवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही प्रियांकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
प्रियांकाचे नाव आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते.
-
अभिनेत्री असण्यासोबतच प्रियांका एक बिझनेस वुमन देखील आहे.
-
अभिनयासोबतच ती तिच्या व्यवसायातूनही करोडोंची कमाई करते.
-
प्रियांकाची एकूण संपत्ती ६२० कोटी आहे. तिची बहुतेक कमाई चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते.
-
प्रियांका एका बॉलीवूड चित्रपटासाठी १२ कोटी रुपये, तर हॉलिवूड वेब सीरिजच्या एका एपिसोडसाठी ती २ कोटी रुपये घेते.
-
प्रियांका अनेक ब्रँड्सशी देखील जोडली गेली आहे, ज्यासाठी ती जवळपास ५ कोटी रुपये फी घेते.
-
प्रियांकाच स्वत:चा ती तिचा स्वतःचा हेअर केअर ब्रँड Anomaly आहे ज्यातून ती करोडोंची कमाई करते.
-
प्रियंकाचे पर्पल पेबल पिक्चर्स नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील चालवते.
-
या प्रोडक्शन हाऊसखाली ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘द स्काय इज पिंक’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
-
याशिवाय प्रियांकाने २०२१ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ‘सोना’ नवाचे भारतीय रेस्टॉरंट उघडले आहे. तर २०२२ मध्ये, होमवेअर ब्रँड ‘सोना होम’ देखील तिने लॉन्च केला आहे.
-
प्रियांकाला लक्झरी वाहनांची खूप आवड आहे.
-
तिच्याकडे २.५ कोटी रुपयांची रोल्स रॉइस, १.१ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ एस क्लास आणि पोर्श, मर्सिडीज बेंझ ई क्लास आणि बीएमडब्ल्यू सारखी महागडी वाहने आहेत.
-
फोटो (लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस)

१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ राशींचं भाग्य उजळणार; गडगंज श्रीमंतीसोबतच करिअरमध्ये होणार प्रगती, पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार