-
सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे.
-
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणदणीत कमाई करताना पाहायला मिळत आहे.
-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटातील अभिनेते आदेश बांदेकर यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांच्या लूकचे प्रचंड कौतुक होत आहे.
-
या चित्रपटात त्यांचा लूक कसा ठरवण्यात आला, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
-
अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी अनेक वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण केले.
-
या चित्रपटात त्या पल्लवी काकडे हे पात्र साकारत आहेत.
-
यात तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं दाखवलं आहे.
-
या चित्रपटाची वेशभूषा साकारणारी युगेशा ओंकार हिने सुचित्रा बांदेकरांच्या लूकबद्दल सांगितले आहे.
-
“मी जेव्हा स्क्रिप्टमधील पल्लवीचं पात्र वाचलं, तेव्हाच तिचा लूक माझ्या डोक्यात ठरवला होता.”
-
“तिच्या वैवाहिक आयुष्यात असलेल्या समस्यांमुळे तिला खूप छान किंवा तरुण दिसायचं होतं.”
-
“त्यामुळे मी खूप बोल्ड आणि चौकटीपलीकडे जाऊन तिला कपडे देण्याचा ठरवलं.”
-
“यात तिचा मेकअपही बोल्ड आहे. तिने केसांना रंगही दिला आहे.”
-
“विशेष म्हणजे पल्लवीच्या गळ्यात मंगळसूत्र फारच खास आहे.”
-
“त्यात तिच्या गळ्यात तिने ए नावाचं इंग्रजी लेटर घातलेलं असतं.”
-
“ए म्हणजे अनिरुद्ध तिच्या नवऱ्याचं नाव आहे.”
-
“मी जेव्हा पल्लवीची वेशभूषा ठरवत होती, तेव्हा मला फार दडपण आलं होतं.”
-
“कारण पल्लवीची वेशभूषा आणि सुचित्रा बांदेकरांचा लूक हा अगदी विरुद्ध आहे.”
-
“केसांना लाल किंवा गुलाबी रंग द्यायचा हे तिच्यासाठी फारच जास्त होतं.” असे युगेशा ओंकारने सांगितले.
-
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत.
-
या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता.

एसटी महामंडळात जम्बो भरती, दहावी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी