-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे.
-
एकीकडे स्वराजच आपला मुलगा आहे हे सत्य मल्हारसमोर उलगडेल का याची उत्सुकता असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.
-
‘शुभंकर ठाकूर’ असं या नव्या पात्राचं नाव असून त्याचं मोनिकाबरोबर खास नातं आहे.
-
हे नातं नेमकं काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
-
मात्र शुभंकरच्या एण्ट्रीने मालिकेत धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की.
-
सुप्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी शुभंकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
या नव्या भूमिकेबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला, स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जुनं नातं आहे.
-
‘लक्ष्य’, ‘पुढचं पाऊल’ आणि ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या.
-
जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा या वाहिनीबरोबर काम करण्याचा योग जुळून आला आहे.
-
एखादं नवं पात्र जेव्हा मालिकेत येतं तेव्हा ते नवी गोष्ट घेऊन येतं. ते पात्र ती गोष्ट रंगवत असतं.
-
शुभंकरच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य रंगेल. परदेशी असलेला शुभंकर बिझनेसच्या निमित्ताने भारतात आला आहे.
-
शुभंकर स्पष्टवक्ता असला तरी मनाने अतिशय हळवा आहे. त्याला इतरांनी केलेली मदत तो कधीच विसरत नाही.
-
शुभंकरचं कामत कुटुंब आणि मोनिकाबरोबर नेमकं काय कनेक्शन आहे हे लवकरच उलगडेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ऑर्गेंझा साडीतील शिवानी रांगोळेचा सुंदर लूक चर्चेत)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या