-
नुकत्याच सोनी लीव्हवर प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम २००३’ या वेबसीरिजमुळे अब्दुल करीम तेलगी हे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.
-
अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर संजय सिंग यांनी पुस्तक लिहिलं. २००१ मध्ये अब्दुल करीम तेलगीचा स्टँप पेपर घोटाळा उघडकीस आला.
-
जी स्कॅम नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे ती सीरिज संजय सिंग यांच्या पुस्तकावरच आधारलेली आहे.
-
अब्दुल करीम तेलगीचे वडील रेल्वे स्टेशनवर काम करायचे. अब्दुल तरुण होता तेव्हाच त्याचे वडील वारले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अब्दुलच्या खांद्यावर येऊन पडली.
-
अब्दुलने उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम केली. फळविक्रेता म्हणून तेलगी काम करायचा. हिंदी, मराठी, उर्दू आणि कन्नड या चारही भाषा त्याला अवगत होत्या.
-
खानापुरहून नोकरीसाठी मुंबईत आलेला तेलगी गल्फमध्ये गेला अन् पण तिथेही तो फारसा टिकला नाही. त्यानंतर तो मुंबईत परतला आणि नॉन इमिग्रेशनचे फेक स्टँप मारुन तो लोकाना गंडा घालू लागला अन् हळूहळू स्टॅम्प पेपरच्या कारभाराकडे त्याने आपला मोर्चा वळवला. तेलगीवर तो फेक पासपोर्ट बनवतो असाची आरोप होता.
-
स्टॅम्प पेपर छापण्यासाठी लागणारी यंत्रे, ही यंत्रे विकत घेण्यासाठी तेलगीने बँका, विमा कंपन्या आणि इतर अनेकांची कशाप्रकारे फसवणूक केली. ३०० हून अधिक लोकांना कामावर ठेवले. या सगळ्यात जवळपास ३० हजार कोटींचा घोटाळा झाला होता. यावर सीरिजचे कथानक बेतलेले आहे.
-
या सगळ्या घोटाळ्यात तेलगीला बऱ्याच बड्या राजकारण्यांचीही साथ होतीच.
-
२००७ मध्ये तेलगीसह त्याच्या इतर सहकाऱ्यांवर खटला दाखल करून त्याला ३० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली.
-
याबरोबरच २०० कोटींचा दंडही तेलगीकडून वासून करण्यात आला.
-
मुंबईच्या ग्रँट रोडवरील एका डान्स बारमधील डान्सरवर तेलगीने एका रात्रीत ९० लाख रुपये उधळ्याची चांगलीच चर्चा झाली होती. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या घोटाळ्यातून तेलगीने किती पैसे कमावले.
-
१३ वर्षांची शिक्षा भोगून झाल्यावर २३ ऑक्टोबर २०१७ या दिवशी बेंगलोरमधील एका रुग्णालयात अब्दुल करीम तेलगी हा चॅप्टर कायमचा संपला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस / सोशल मीडिया)

नरेंद्र मोदी पंतप्रधान का बनले? सरन्यायाधीश भूषण गवईंनी थेट लंडनमधून सांगितले…