-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने अलीकडेच नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
प्रसादने नुकतीच त्याच्या नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
प्रसाद खांडेकरच्या नव्या घराच्या गृहपूजन सोहळ्याला हास्यजत्रेतील काही कलाकार आणि घरातील कुटुंबीय उपस्थित होते.
-
नम्रता संभेराव आणि गौरव मोरे हे दोघे अभिनेत्याच्या आनंदात सहभागी झाले होते.
-
प्रसादने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची बायको, मुलगा, आई आणि इतर कुटुंबीय पाहायला मिळत आहे.
-
“नवीन घर…अजून एक स्वप्न पूर्ण…घर शोधायला लागले १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला गेले २ महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं…त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोंना दिलं आहे.
-
प्रसादने नव्या घरासाठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली नेमप्लेट तयार करून घेतली आहे.
-
घराच्या नेमप्लेटवर कलेशी संबंधित अनेक चित्रं आहेत.
-
व्हिडीओ कॅमेरा, पेन, कलेची दोन रुपं या नेमप्लेटवर पाहायला मिळतात.
-
‘श्री. आणि सौ. खांडेकर इथेच राहतात’ असं नाव अभिनेत्याच्या नव्या घराच्या पाटीवर लिहिलेलं आहे.
-
नवीन घर घेतल्यामुळे प्रसाद खांडेकरवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
नम्रता संभेराव, ऋतुजा बागवे, अमित फाळके, प्रथमेश परब या कलाकारांनी अभिनेत्याला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल