-
Unmarried TV Actress : अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांनी छोट्या पडद्यावर सुनेची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली. परंतु, खऱ्या आयुष्यात त्या अविवाहित आहेत. आम्ही आज तुम्हाला अशा आठ अभिनेत्रींची माहिती देणार आहोत.
-
‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील अक्षरा नावाच्या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झालेल्या हिना खानने खऱ्या आयुष्यात लग्न केलेलं नाही. रॉकी जयस्वालबरोबर ती अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. (फोटो : हिना खान इन्स्टाग्राम)
-
५१ वर्षी अभिनेत्री साक्षी तन्वर हिने एक आदर्श सून आणि आदर्श आईची भूमिका साकारून अनेकवेळा लोकांची मनं जिंकली आहेत. पण साक्षीचं लग्न झालेलं नाही. मी एकटीच आनंदी आहे असं तिने प्रत्येकवेळा सांगितलं आहे. (फोटो : साक्षी तन्वर फेसबूक)
-
टीव्ही सीरियल आणि अनेक चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राची देसाई हिनेही लग्न केलेलं नाही. ‘कसम’ या मालिकेत तिने एका सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारली होती. (फोटो : प्राची देसाई इन्स्टाग्राम)
-
‘भाभीजी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची लोकप्रिय भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली शिल्पा शिंदे खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे. शिल्पाचा रोमित राजशी साखरपुडा झाला होता, परंतु त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. (Photo : Still from serial)
-
जिया मानेक हिने ‘साथ निभाना साथिया’मध्ये गोपी बहूची लोकप्रिय भूमिका साकारली होती. जियानेही अद्याप लग्न केलेले नाही. (फोटो : जिया मानेक इन्स्टाग्राम)
-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं आहे. तिचं नाव कधी ऋत्विक धनजानीबरोबर जोडलं गेलं तर कधी तिच्या सुमीत सुरीबरोबरच्या नात्याची चर्चा झाली. परंतु सुरभीने लग्न केलेलं नाही. (फोटो : जिया मानेक इन्स्टाग्राम)
-
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री सृती झा हिचं नाव बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी आणि हर्षद चोप्राबरोबर जोडलं गेलं आहे. सध्या ती कुणाल कपूरला डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, सृती अद्याप अविवाहित आहे. (फोटो: स्क्रीन ग्रॅब)
-
‘जमाई राजा’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निया शर्माही अविवाहित आहे. सध्या ती अभिनेता राहुल सुधीरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी मुकेश भट्ट यांच्या ट्विस्टेड या वेबसिरीजमध्ये एकत्र काम केले होतं. (फोटो: सोशल मीडिया)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल