-
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या महाराष्ट्राच्या घराघरात ‘अप्पू’ या नावाने ओळखली जाते.
-
आपल्या अभिनयाने तिने लगेचच प्रेक्षकांना आपलसं करून घेतलं.
-
नुकतंच ज्ञानदाचे गुलाबी साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
-
छायाचित्रकार शशांक साने याने हे अप्रतिम फोटोशूट केलंय.
-
यावेळी ज्ञानदाने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
-
मोकळे केस, गळ्यात ठुशी, कपाळावर चंद्रकोर लावलेली ज्ञानदा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती.
-
ज्ञानदाचं हे साधं, मात्र तितकंच सोज्वळ फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
चाहत्यांना ज्ञानदाचे फोटो खूपच आवडले असून त्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो : शशांक साने/इन्स्टाग्राम

बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल