-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील लोकप्रिय पात्र ‘महाराणी येसुबाई’ साकारल्यामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
या मालिकेनंतर प्राजक्ताला संपूर्ण महाराष्ट्रातून सन्मानाची वागणूक मिळते.
-
प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
नुकतंच विजयादशमीनिमित्त प्राजक्ताने हटके फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी प्राजक्ताने घागरा-चोळीमधील हटके फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
मल्टीकलर घागरा-चोळीमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती.
-
यावेळी हातात दांडिया घेऊन वेगवेगळ्या पोजमध्ये प्राजक्ताने फोटो काढले आहेत.
-
प्राजक्ताचा मेकअप पूर्णिमा पवार यांनी केला असून दीपा नानेकर यांच्या बुटीकमधील हा ड्रेस आहे.
-
प्राजक्ताचे हे भन्नाट फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. (Prajakta/Instagram)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…