-  
  अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात.
 -  
  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी लेक मसाबाचं पहिलं लग्न आणि घटस्फोटाबद्दल भाष्य केलं.
 -  
  मसाबाने घटस्फोटाबद्दल सांगितल्यानंतर झालेली अवस्था याबद्दल नीना गुप्ता यांनी माहिती दिली.
 -  
  या मुलाखतीत नीना यांनी त्यांची मुलगी मसाबाच्या पहिल्या लग्नाबाबत झालेल्या चुकीबद्दल भाष्य केलं.
 -  
  मसाबाचं पहिलं लग्न मधु मंटेनाशी झालं होतं.
 -  
  मसाबाला लग्न करायचे नव्हते. तिला आधी तिच्या भावी पतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. पण मी त्यास नकार दिला. – नीना गुप्ता
 -  
  ‘तू त्याच्याबरोबर शिफ्ट होणार नाहीस. सोबत राहायचं असेल तर तू लग्न कर,’ असं मी म्हटलं.
 -  
  ही माझी चूक होती आणि नंतर ते विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटामुळे मी उद्ध्वस्त झाले होते. मी त्यांच्या घटस्फोटाची कल्पनाही केली नव्हती – नीना गुप्ता
 -  
  कारण माझे पती आणि मी दोघेही तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर खूप प्रेम करत होतो आणि अजूनही प्रेम करतो. – नीना गुप्ता
 -  
  तो खरोखर छान माणूस आहे, पण त्याचं आणि मसाबाचं लग्नानंतर नाही पटलं.- नीना गुप्ता
 -  
  तिने घटस्फोटाबद्दल सांगितल्यावर मी महिनाभर सुन्न झाले होते. तो काळ खूप कठीण होता. पण तुमच्या हातात काही नाही, कारण हे दुसऱ्याचे आयुष्य आहे. – नीना गुप्ता
 -  
  दरम्यान, मसाबा गुप्ताने मधू मंटेनापासून विभक्त झाल्यानंतर काही वर्षांनी लग्न केलं.
 -  
  मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी जानेवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली.
 -  
  तर, मसाबाचा पूर्वाश्रमीचा पती मधू मंटेना यानेही दुसरं लग्न केलं.
 -  
  त्याच्या पत्नीचे नाव इरा त्रिवेदी आहे. (फोटो – मसाबा गुप्ता, नीना गुप्ता आणि मधू मंटेना यांचे इन्स्टाग्राम)
 
  देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही