-
विकी कौशल: विकी कौशलचा चित्रपट सॅम बहादूर १ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रदर्शन होण्यापूर्वी, विकी कौशल आणि मेघना गुलजार इंडियन एक्सप्रेस’ एक्सप्रेस अड्डा येथे उपस्थित होते. या कार्यक्रमात सॅम बहादूरसोबत विक्कीने त्याच्याशी संबंधित विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. ( फोटो सौजन्य -एक्सप्रेस अड्डा – आणि सॅम बहादूर चित्रपट – Walt Disney Studios Motion Pictures)
-
विकी कौशलने एक्सप्रेस अड्डामध्ये सांगितले की, “तो जेव्हाही चित्रपट करतो तेव्हा तो त्याच्या क्लायमॅक्सबद्दल विचारत नाही किंवा विचारही करत नाही.” (फोटो सौजन्य -एक्सप्रेस अड्डा)
-
राझी चित्रपटाचे उदाहरण देताना विक्कीने सांगितले की, “जेव्हा तो हा चित्रपट करत होता, तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की. क्लायमॅक्समध्ये सेहमत (आलिया) इक्बालचा (विकी कौशल) विश्वासघात करेल. ( फोटो सौजन्य – राझी चित्रपटातील क्षणचित्र – AA Films, Zee Studios)
-
विकी कौशलचा असा विश्वास आहे की , जर त्याला चित्रपटाचा क्लायमॅक्स माहित असेल तर त्याचा त्याच्या अभिनयावर परिणाम होईल. क्लायमॅक्स समजल्यानंतर तो सीन ज्या प्रामाणिकपणाने करायला हवा होता, तो ते करू शकणार नाही. (हमत (आलिया) इक्बालचा (विकी कौशल) विश्वासघात करेल. ( फोटो सौजन्य – राझी आणि उपी चित्रपटातील क्षणचित्र – AA Films, Zee Studios and RSVP )
-
विकीने सांगितले की, ज्या दिवशी त्याचा सीन शूट होणार आहे त्या दिवशी तो फक्त तोच सीन वाचतो. यासह, तो त्या दृश्यात आपली पूर्ण ताकद लावू शकतो. (फोटो सौजन्य -एक्सप्रेस अड्डा)
-
विकी कौशल दुसऱ्यांदा मेघना गुलजारसोबत सॅम बहादूरच्या भूमिकेत काम करत आहे. याआधी त्याने मेघना की राझीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मने जिंकले होते. (फोटो सौजन्य -एक्सप्रेस अड्डा)
-
सॅम बहादूर १ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विकी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात विकीसोबत सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (फोटो सौजन्य – सॅम बहादूर चित्रपट – Walt Disney Studios Motion Pictures)

Operation Sindoor Live Updates: भारतीय लष्करानं पत्रकार परिषदेत स्पष्ट केली एअर स्ट्राईकसंदर्भात सविस्तर भूमिका!