-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे गौरव मोरे.
-
‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.
-
सध्या गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’व्यतिरिक्त विविध मराठीसह, हिंदी चित्रपटात झळकत आहे.
-
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ४’, ‘अंकुश’, ‘लंडन मिसळ’ या चित्रपटांमध्ये तो झळकला.
-
लवकरच त्याचे आगामी चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत.
-
नुकताच गौरव अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आतापर्यंतचा प्रवास आणि बरेच खुलासे केले.
-
तसेच या मुलाखतीमध्ये गौरवबरोबर विविध खेळ खेळण्यात आले. यावेळी गौरवकडून गुगलवर त्यांच्यासंदर्भात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेतली गेली.
-
या खेळादरम्यान गौरवने त्याला मिळालेल्या पहिल्या मानधनाचा खुलासा केला.
-
गौरवला पहिलं मानधन हे दिवसाला १५० रुपये होतं. तो म्हणाला की, “एका नाटकाला मी बॅकस्टेज करायचो त्याचे मला दिवसाला १५० रुपये मिळायचे.”

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल