-
Ira Khan Wedding: आमिर खानची लेक आयरा खानने ३ जानेवारीला नूपुर शिखरे याच्याशी विवाहगाठ बांधली. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे.
-
८ जानेवारीला उदयपूरमध्ये आयरा व नूपुर रीतसर लग्न करणार असल्याचे सुद्धा समजतेय. दरम्यान या लग्नाच्या वेळी नूपुर शिखरने घातलेल्या कपड्यांची सुद्धा विशेष चर्चा आहे
-
आमिर खानच्या जावयाला लग्नासाठी साधा कुर्ता घेता आला नाही का असा प्रश्न करत अनेकांनी नूपुरच्या बनियान आणि शॉर्ट्स लुकला ट्रोल केले आहे.
-
पण जेव्हा तुम्हाला आयरा खानचा पती नूपुर शिखरेच्या या लूकमागील खरं कारण समजेल तेव्हा तुम्हीही कदाचित कौतुक कराल.
-
नूपुर शिखरे हा जिममध्ये ट्रेनर आहे आणि अर्थात त्यामुळे त्याच्या लग्नाच्या दिवसाला सुद्धा त्याला कदाचित व्यायामाची थीम जोडायची असावी. म्हणूनच नूपुर सांताक्रूझवरून बंदरापर्यंत धावत लग्न करण्यासाठी पोहोचला होता.
-
सांताक्रूज ते बांद्रा मध्ये साधारण ८ किमी अंतर आहे, हे अंतर पार करताना नूपुर जॉगिंग करत आला होता
-
नूपुरने वरातीत ढोल वाजवल्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहेत
-
याचदरम्यान वरातीत नाचतानाचे नूपुरचे फोटो सुद्धा बनियान व शॉर्ट्स घालूनच दिसत आहेत
-
नूपुर याच वेशात आयराच्या बाजूला जाऊन बसला होता आणि कागदपत्रांवर सही करून त्याने आपल्या लग्नाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी