-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व निर्माते मंगेश देसाई यांनी नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.
-
गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
अभिनेत्याच्या घरी अतिशय थाटामाटात गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
-
याची खास झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबीयांनी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला खास पारंपरिक लूक केला होता.
-
अभिनेत्याच्या नवीन घराच्या दारावरील सुंदर व हटके नेमप्लेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
मंगेश देसाईंनी दारावर ‘मंगेश शलाका साहील देसाई’ अशी नेमप्लेट लावली आहे.
-
नेमप्लेटमध्ये कुटुंबातील प्रत्येकाचं नाव जोडल्यामुळे या सुंदर नेमप्लेटची सध्या विशेष चर्चा होत आहे.
-
गणेश जयंतीच्या मुहूर्तावर मंगेश देसाईंनी नव्या घरात खास पूजेचं आयोजन केलं होतं.
-
यावेळी मराठी कलाविश्वातील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली होती.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, त्यांच्या सूनबाई वृषाली शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगेश देसाई यांची भेट घेऊन अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
मंगेश देसाईंच्या नव्या घराच्या बाल्कनीतून सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो.
-
त्यांनी नव्या घरात आकर्षक फर्निचर करून घेतलं आहे.
-
याशिवाय मंगेश देसाईंच्या घरातील विठुरायाची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते.
-
दरम्यान, मराठी कलाविश्वातून शर्मिष्ठा राऊत, ऐश्वर्या व अविनाश नारकर, प्रवीण तरडे, महेश लिमये अशा अनेकांनी मंगेश देसाईंच्या नव्या घरातील गृहप्रवेश पूजेला उपस्थिती लावली होती. ( सर्व फोटो सौजन्य : मंगेश कुलकर्णी इन्स्टाग्राम )

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case