-
बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा गोव्यात थाटामाटात पार पडला.
-
२१ फेब्रुवारीला दक्षिण गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये रकुल-जॅकीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे जोडपं पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकलं आहे.
-
जॅकी-रकुलच्या लग्नाला कुटुंबीयांसह अनेक बॉलीवूड कलाकार आणि त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले होते.
-
रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानीच्या लग्नात वरुण धवन, राज कुंद्रा, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
-
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रकुल आणि जॅकी यांचा विवाहसोहळा दोन पद्धतीत पार पडला आहे. पंजाबी व सिंधी अशा दोन पद्धतीत त्यांनी लग्न केलं आहे.
-
लग्नसोहळा पार पडल्यावर हे दोघेही पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
त्याचबरोबर रकुलने लग्नातील काही फोटोही सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
यावेळी जॅकीने पांढऱ्या रंगाची शेरवानी परीधान केली होती. तर, रकुल प्रीतने बेबी पिंक रंगाचा सुंदर असा लेहेंगा, त्यावर भरजरी दागिने असा आकर्षक लूक केला होता.
-
या जोडप्यावर आता नेटकऱ्यांसह कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
गोव्यात लग्नबंधनात अडकल्यावर आता रकुल व जॅकी लवकरच मुंबईत एका भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत.
-
हे जोडपे लग्नातील नवनवीन फोटो व विवाह सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर केव्हा शेअर करणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
रकुल-जॅकीच्या लग्नाआधीच्या विधींना १९ फेब्रवारीपासून सुरुवात झाली होती. यानंतर गोव्याला लग्नासाठी रवाना होण्यापूर्वी या जोडप्याने एकत्र मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं होतं.
-
दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रकुल प्रीत लवकरच ‘इंडियन २’ चित्रपटात झळकणार आहे.
-
तसेच जॅकी ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक