-
बॉलिवूडमधील कलाकार अनेकदा अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या व्यवसायांमध्येही आपला हात आजमावताना दिसतात.
-
अनेक कलाकारांनी स्कीनकेअर प्रोडक्ट्स, तसेच कपड्यांच्या व्यवसायात मोठे यश मिळवले आहे.
-
यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. शिल्पाने तिचा पती राज कुंद्रासह मुंबईमध्ये ‘बॅस्टियान’ हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं.
-
हे रेस्टॉरंट अतिशय भव्य असून ते दादर येथील कोहिनूर स्क्वेअरच्या 48व्या मजल्यावर बांधण्यात आले आहे.
-
त्याच्याच पाठोपाठ तिने बंगळुरूमध्ये एक नवे रेस्टॉरंट सुरू केले आहे. नुकतीच शिल्पाने या रेस्टॉरंटमध्ये पूजा केली आहे.
-
यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
शिल्पाने या पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर आपला आनंद व्यक्त केला आहे.
-
याच कारणाने शिल्पाचे हे रेस्टॉरंट येणाऱ्या पाहुण्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणारे असेल असा सर्वांनाच विश्वास आहे.
-
( सर्व फोटो : अधिकृत शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम अकाऊंट)

