-
’12th Fail’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विक्रांत मेस्सीने काही दिवसांपूर्वी गोड बातमी दिली.
-
गेले अनेक दिवस हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांतचा आनंद द्विगुणित झाला आहे.
-
फेब्रुवारी 2022 मध्ये, विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लग्नबंधनात अडकले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी आपल्या बाळाच्या जन्माची बातमी सर्वांसह शेअर केली.
-
७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
-
नुकतंच विक्रांतने आपल्या लेकाची पहिली झलक दाखवून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे.
-
विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या १६ दिवसांनंतर पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
बाळाचे फोटो शेअर करत विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कुठल्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही….आम्ही त्याचं नाव ‘वरदान’ ठेवलं आहे.”
-
विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. ३ मे २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
याशिवाय ‘सेक्टर ३६’,‘फिर आई हसीन दिलरुब या चित्रपटांमध्ये विक्रांत पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो – विक्रांत मेस्सी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो