-
शोभिता धुलिपाला ही अभिनेत्री आता सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिची नवी ओळख करुन देण्याची गरज उरलेली नाही. खूप कमी कालावधीत तिने लोकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. (सर्व फोटो-शोभिता धुलिपाला, फेसबुक पेज)
-
शोभिता ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत विविध चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये ती झळकली आहे.
-
३१ वर्षीय शोभिताने अद्याप लग्न केलेलं नाही. नागा चैतन्यशी तिच अफेअर आहे अशा चर्चा रंगत असतात. त्यामुळेही ती चर्चेत असते.
-
शोभिताही हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे.
-
नागा चैतन्य म्हणजे समंथा प्रभूचा पूर्वाश्रमीचा नवरा. या दोघांचा घटस्फोट झाल्यापासून शोभिता नागा चैतन्याच्या आयुष्यात आली. या दोघांचं अफेअर आहे असं कायम सांगितलं जातं.
-
शोभिता किंवा नागा चैतन्य यांनी याबाबत अधिकृतरित्या काहीही जाहीर केलेलं नाही.
-
शोभिताचा हॉट अंदाज, ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर तिचे फोटो कायमच पोस्ट करत असते.
-
शोभिताने तिच्या रिलेशनशिपबाबत अधिकृत भाष्य केलेलं नसलं तरीही शोभिताला आई व्हायचं आहे. तिने एका मुलाखतीत हे वक्तव्य केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
शोभिताने नुकत्याच एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं की तिला मातृत्व अनुभवायचं आहे. आपल्या आयुष्यात आई होणं फार महत्त्वाचं वाटतं असं तिने म्हटलं आहे. शोभिताचं लग्न झालेलं नाही.. तरीही तिने असं वक्तव्य केल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे.
-
आयुष्याचं एक खास ध्येय असेलच असं नाही.. पण आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा माणसाला जगता आला पाहिजे. त्यासाठी त्याने त्याची आवड जपली पाहिजे असंही शोभिताने म्हटलं आहे.
-
आयुष्याकडून काय हवं आहे असं तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने मला मातृत्व अनुभवायचं आहे असं उत्तर दिलं. तसंच मी ज्या क्षणी आई होईन तो क्षण माझ्यासाठी सुंदर असेल असंही शोभिताने म्हटलं आहे.
-
शोभिता आता लग्न कधी करणार आणि ती आई कधी होणार तो क्षण तिच्या आयुष्यात कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

घोटाळेबाज ‘जेन स्ट्रीट’कडून दंडापोटी ४,८४३ कोटी जमा; लगोलग निर्बंध उठवण्याची ‘सेबी’ला विनवणी