-
कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाणने काल (३ मार्च) रोजी अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
२०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता आणि सौरभने प्रमुख भूमिका साकारली होती.
-
योगिता आणि सौरभने लग्नसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी योगिताने गडद गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
-
सौरभने लग्नसोहळ्यासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता सेट परिधान केला आहे.
-
सध्या चाहत्यांमध्ये योगिताच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा होत आहे.
-
लग्नातील फोटोंना योगिता आणि सौरभने ‘Forever Humsafar’ असे कॅप्शन दिले आहे.
-
योगिता आणि सौरभच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
योगिता आणि सौरभच्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..