-
दर वर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. बॉलीवूडमध्येही अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात मोठ्या पडद्यावर नारी शक्तीचं दर्शन घडवण्यात आलं आहं. तुम्ही हे चित्रपट OTT वर पाहू शकता. (PC : Sonakshi Sinha/FB)
-
दहाड
या सिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या सिरीजमधील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. महिला दिनानिमित्त ही सिरीज तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (PC : Sonakshi Sinha/FB) -
महाराणी
बिहारच्या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित ‘महाराणी’ या वेबसिरीजचा तिसरा सीझन सोनी लिव्हवर ७ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये हुमा कुरेशी एका राजकारणी महिलेच्या भूमिकेत आहे. (PC : Sonyliv) -
माई
या वेब सीरिजमध्ये एका मध्यमवर्गीय आईची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे, जी आपल्या मुलीच्या खुन्यांना शोधण्यासाठी शक्तिशाली लोकांचा सामना करते. साक्षी तन्वरने यामध्ये आईची भूमिका साकारली आहे, जिच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. तुम्ही ही सिरीज Netflix वर पाहू शकता. (PC : Netflix) -
पिंक
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूचा हा चित्रपट समाजाला अनेक संदेश देतो. समाज कितीही पुढारलेला झाला तरी आजही या समाजात काही लोक असे आहेत जे कपड्याच्या आधारावर मुलींच्या चारित्र्याबद्दल मत बनवतात. त्यातूनच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतात. हा चित्रपट अशा अनेक विषयांना हात घालतो. तुम्ही हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. (PC : Hotstar) -
थप्पड
तापसी पन्नू स्टारर चित्रपट ‘थप्पड’ हा पुरुषप्रधान विचारांच्या समाजाला आरसा दाखवणारा आहे. जे पुरुष महिलांवर हात उचलतात किंवा घरगुती हिंसाचाराला क्षुल्लक मानतात, त्यांना या चित्रपटातून चपराक लगावण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (PC : Prime Video -
छपाक
हा चित्रपट ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोनने लक्ष्मीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. (PC : Hotstar) -
नीरजा
हा चित्रपट एअर होस्टेस नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित आहे, जिने 1986 मध्ये अपहरण झालेल्या PAMM फ्लाइट 73 मधील ३५९ लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या चित्रपटात सोनम कपूरने नीरजाची भूमिका साकारली आहे आणि हा चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. (PC : Hotstar)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल